गणेश बबनराव गिते

MI gaNaeSa babanarava igatae : samaajasaevaetaaIla AaadSa_ vyaai|tamatva

सरल आणि परोपकारी व्यक्तिमत्व असणारे श्री. गणेश गिते हे शेतकरी कुटुंबातले असून, त्यांना व्यवसायाची आवड होती. परंतु, त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी समाजसेवेला आपल्या जीवनात महत्व दिले आहे तसेच नाशिक शहराच्या विकासासाठी अतूट बांधिलकी दर्शवली आहे. त्यांनी आपले शिक्षण हे  बॅचलर ऑफ आर्ट्स घेऊन पूर्ण केले, परंतु त्यांच्यासाठी ही फक्त सुरुवात होती.

समाजात मूर्त बदल घडवण्याच्या प्रेरणेने, त्यांनी आपले जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला व राजकारणात प्रवेश केला. सध्या, ते नाशिक महानगरपालिकेमध्ये माननीय स्थायी समिती सभापती म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानासोबतच, श्री. गणेश गिते हे नाशिकच्या नामांकित नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि दि नाशिक मर्चंट को. ऑप. बँक यामध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी, त्यांनी त्यांच्या पत्नी सौ. दिपाली गिते यांच्या सहकार्याने स्व. हरिभाऊ गिते फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

janataesaaOI, janaihtaasaaOI

श्री. गणेश बबनराव गिते हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते असून, ते राजकीय व सामाजिक कार्यात विकासाबरोबरच जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देतात.

vikas purush

विकासपुरुष

समाजसेवा म्हणजे लोकांचे कल्याण आणि विकासाकडे एक महत्वपूर्ण पाऊल… नाशिक शहराचा उत्तम विकास आणि सुशोभिकरण करण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी श्री. गणेश गिते हे सदैव प्रयत्नशील राहतात. दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांप्रती त्यांची अतूट बांधिलकी जबाबदारीची खोल भावना दर्शवते. 

netrutva image

सक्षम नेतृत्व

नागरिकांशी  थेट संवाद साधण्यासाठी, त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी वैयक्तिकरित्या स्वत:ला समर्पित करणारे तसेच नियमित बैठका आणि संवादांद्वारे, नागरिकांचा आवाज ऐकला जाईल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल याची खात्री करून असंख्य समस्या हाताळणारे सक्षम नेतृत्व ते म्हणजे श्री. गणेश गिते! 

कर्तव्यनिष्ठ

कुठलेही कार्य हाती घेताना नागरिकांच्या गरजा ओळखण्यात कुशल असलेले श्री. गणेश गिते यांचे कार्य हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी आजपर्यंत नागरिकांच्या समस्या जाणून, त्यांच्याशी संवाद साधून आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.